Saturday, January 14, 2012

पुन्हा (पुन्हा) शेक्सपिअर

पुन्हा (पुन्हा) शेक्सपिअर
19 Apr 2008, 2219 hrs IST

SMS NEWS to 58888 for latest updates

- शशिकांत सावंत



.....................

अलिकडे माझा एक मित्र म्हणाला 'माझा मुलगा फक्त ज्यात चित्र आहे अशीच पुस्तकं वाचू शकतो. त्यावर मी म्हटलं 'बापरे, म्हणजे तो 'श्यामची आई' वाचू शकणार नाही. पण शेक्सपिअर मात्र वाचू शकेल.' याचं कारण मराठी पुस्तकं नेहमी मूळ प्रकारातच उपलब्ध असतात. एखाद्या पुस्तकाचं संक्षिप्त, अतिसंक्षिप्त किंवा मुलांसाठी केलेलं खास सचित्र पुस्तक स्वरूप अशा रूपात ती उपलब्ध नसतात. उलट शेक्सपिअर तुम्हाला हव्या त्या स्वरूपात मिळतो. कॉमिक बुकच्या रूपात, निवडक कथांच्या, आजच्या इंग्रजीच्या रूपात, ऑडिओबुक, ई-बुक अशा शेकडो स्वरूपांत तो उपलब्ध आहे.

१५६४ साली जन्मलेल्या शेक्सपिअरचं नाव पृथ्वीवरच्या थोड्याशा साक्षर असलेल्या माणसानेही ऐकलेलं असतंच. त्याचं एखादं तरी नाटक मूळ स्वरुपात किंवा नाटकाचा व्हिडिओ, सिनेमा, ऑपेरा, पाठ्यपुस्तकातील धडा अशा कुठल्याही रूपात अनुभवलेलं असतं. पीटर ब्रूकपासून ते अकिरा कुरासावा किंवा आजच्या विशाल भारद्वाजपर्यंत अनेक दिग्दर्शकांना शेक्सपिअर आव्हान वाटत आला आणि लॉरेन्स ऑलिव्हिए, जॉन गिलगुडपासून ते आजच्या अल पचिनोपर्यंतच्या नटांनाही.

शेक्सपिअर हा वॉविर्कशायरमध्ये स्ट्रॅटफर्ड अपॉन अॅवन इथं जन्मला. तिथल्या होली ट्रिनिटी चर्चमध्ये २६ एप्रिल १५६४ साली त्याचा बाप्तिस्मा झाल्याचा पुरावा सापडतो. पण त्यानंतरचं त्याचं आयुष्य अनेक संदर्भांच्या तुकड्यांनी जुळवावं लागतं. १६८१ साली जॉन ऑब्रे या नटाने त्याचं चरित्र लिहिलं. १७०९ मध्ये निकोलस रोवे याने आणखी एक चरित्र लिहिलं. एकात त्याचे वडील हातमोजे बनवत असा उल्लेख आहे. तर दुसऱ्यात त्याचे वडील खाटिक होते असं म्हटलं आहे. शेक्सपिअरला सहा भावंडं होती आणि त्यातील एक त्याच्यासारखाच नट होता. शेक्सपिअर स्ट्रॅटफर्ड ग्रामर स्कूलमध्ये शिकला. १५८२ मध्ये त्याने अॅने हॅथवेशी लग्न केलं. त्यानंतर १५९२ पर्यंतचं त्याचं चरित्र धुक्यातच आहे. या मधल्या काळात तो गुन्हेगारी खटल्याच्या भीतीने पळून गेला आणि नाट्यगृहाच्या बाहेर घोडे सांभाळण्याचं काम करू लागला, अशी नोंद रोवेच्या पुस्तकाच्या १७६५च्या पुनर्मुदणात आहे. तो शाळेत शिक्षक असावा अशी नोंद दुसऱ्या चरित्रात आहे. त्याची सुरूवातीची नाटकं रोमन प्रहसनांच्या शैलीत बेतली असल्याने आणि ती अकॅडमिक शैलीत असल्याने तो शिक्षक असावा या मताला दुजोरा मिळतो.

१५९१पासून त्याने नाटकं लिहायला सुरूवात केली आणि दोन वर्षांत त्याची नाटककार म्हणून नोंद घेतली जाऊ लागली. कारण रॉबर्ट ग्रीन या समकालीन नाटककाराने त्याच्यावर तेव्हा 'आमची पिसे अंगावर झुलवणारा कावळा' अशी टीका केली. शेक्सपिअर लॉर्ड चेंबरलीनच्या नाटक कंपनीत प्रथम अभिनेता व नंतर लेखक बनला. 'हेन्री सिक्थ', 'रिचर्ड थ्री', 'कॉमेडी ऑफ एरर्स', 'टेमिंग ऑफ द शू', 'लव्हज लेबर लॉस्ट', 'रोमिओ अॅन्ड जुलिएट' ही नाटकं त्यांनी १५९१ ते १५९६ या काळात लिहिली आणि ती लोकप्रिय झाली. १५९६ साली तो गावी परतला तेव्हा तो प्रस्थापित नाटककार बनला होता.

' हॅम्लेट,' ऑथेल्लो,' किंग लियर', मॅक्बेथ ही महत्त्वाची नाटकं त्याने १६०० ते १६०१ या काळात लिहिली. त्यानंतर काही काळ तो जवळजवळ निवृत्त झाला. आपल्या नाटकांसाठी त्याने सेनेकासारखा रोमन लेखक, इतिहासकार प्लूटार्क, इतर समकालीन नाटककारांचे प्लॉट्स यांची मुक्त उसनवारी केली. हॅम्लेट हे तेव्हाचे लोकप्रिय नाटक होते. त्यावर त्याने त्याच नावाचे स्वत:चे नाटक बेतले. पण तरी लक्षात राहिली ती शेक्सपिअरची नाटकं. १६०६ ते १६०८ या काळात त्याने 'अँटनी अँड क्लिओपात्रा', 'टिमॉन ऑफ अथेन्स', 'विंटर्स टेल्स', 'टेम्पेस्ट' आदि नाटकं लिहिली. १६१६ साली तो मरण पावला. त्यानंतर १६२३ मध्ये त्याचा १८ नाटकांचा संग्रह प्रसिद्ध झाला. याला 'र्फस्ट फोलियो' असं म्हटलं जातं. त्यानंतर त्याची १८ नाटकं 'र्फस्ट कोतोर्' (ह्नह्वश्ाह्मह्लश्ा) म्हणून प्रसिद्ध झाली. पुढे वारंवार प्रसिद्ध होणाऱ्या त्याच्या नाटकांच्या संग्रहांना अभ्यासकांच्या सोयीसाठी भ्क्त २, क्त-३, क्त-४ असं संबोधलं जातं.

पहिला फोलियो आणि कोतोर् याच्यातून मूळ नाटक वेचून काढणं हे चारशे वर्षं अभ्यासकांना आव्हानच ठरलं आहे. कारण अनेकदा नट स्वत:ची वाक्य किंवा शब्द वापरून शेक्सपिअरच्या ताजमहालाला वीट लावत. (उदा. हॅम्लेटच्या मृत्यू प्रसंगीचे चार 'ओ' किंवा हॅम्लेटमधीलच ञ्जद्धद्बह्य ह्लश्ाश्ा ह्लश्ाश्ा ह्यश्ाद्यद्बस्त्र द्घद्यद्गह्यद्ध... ऐवजी ह्यड्डद्यद्यद्बद्गस्त्र हवे असे हेरॉल्ड जेनकिन्स या ९४ वर्षांच्या अभ्यासकाने सांगितले. त्याने संपादित केलेल्या 'हॅम्लेट'चे खरे रूप अलिकडे 'आर्डेन शेक्सपिअर'मध्ये प्रसिद्ध झाले, तेव्हा ते वाचून अनेकांना धक्का बसला. यात हॅम्लेटच्या मूळ तिन्ही प्रतींमधील पाठभेद दिले आहेत.

बाजारात ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, आर्डेन, स्वान, पेंग्विन, बीबीसी अशा अनेक प्रकाशकांची संपादित शेक्सपिअरची सुटी नाटकं तसंच समग्र खंड उपलब्ध आहेत. त्यात टेक्स्ट आणि सोबत शब्दार्थ अशी त्यांची रचना असते. विशेषत: विद्यार्थ्यांसाठी मूळ शेक्सपिअरन भाषेतील नाटक डाव्या पानावर आणि सध्याच्या इंग्रजीतील त्याचं रूप उजव्या पानावर अशी नाटकं उपलब्ध आहेत. कॉमिक बुक्स, डिजिटल कॉमिक्स, छोट्यांसाठी सचित्र कथा, निव्वळ कथानक सांगणारी लॅम्ब्ज टेल ऑफ शेक्सपिअर, केवळ सॉनेट्स आणि त्याच्या इतर कविता, बीबीसीने प्रकाशित केलेले नाटकांचे व्हिडीओज, सिनेमा, ऑपेरा, ऑडिओ कॅसेट, ई-बुक अशा विविध रूपांत शेक्सपिअर उपलब्ध आहे. शेकडो वेबसाइटवर शेक्सपिअरची नाटकं आणि त्याचा मजकूर वाचता येतो.

गोपाळ गणेश आगरकरांनी हॅम्लेटचं 'विकार विलसित' नावाने रूपांतर केलं. त्यानंतर मराठी अनुवादांची व रुपांतरांची मोठी परंपराच निर्माण झाली. वि. वा. शिरवाडकरांनी केलेलं 'ऑथेल्लो'चं रुपांतर, विंदानी केलेलं 'किंग लियर', मंगेश पाडगावकर यांनी केलेला 'ज्युलिअस सीझर', 'टेम्पेस्ट'चा अनुवाद, अरूण नाईकांनी केलेलं शब्दश: भाषांतर उपलब्ध आहेच. पण परशुराम देशपांडे यांनी पूर्ण शेक्सपिअर मराठीत अनुवादित केला आहे.

१६१६ साली शेक्सपिअर मरण पावला, तो नाटक आणि काव्य यातून विपुल शब्दसंपत्तीचा वारसा ठेवून. इंग्रजीला जगातील महत्त्वाची भाषा बनविण्यात शेक्सपिअरचा मोठा वाटा आहे. त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे.

जॉर्ज बर्नाड शॉला एक मित्र म्हणाला, 'मला शेक्सपिअर आवडत नाही.' तेव्हा शॉ उत्तरला 'तुला तीच शिक्षा आहे.'

पटावरील राजा

पटावरील राजा
2 Feb 2008, 2319 hrs IST

SMS NEWS to 58888 for latest updates

शशिकांत सावंत
बॉबी फिशरचा वयाच्या चौसष्टाव्या वषीर् झालेला मृत्यू ही बुद्धिबळ रसिकांना चटका लावणारी गोष्ट आहे. आज बुद्धिबळाला जे ग्लॅमर आहे ते प्राप्त करून देण्यात बॉबी फिशरचा मोठा वाटा आहे. १९७२ साली त्याने बोरीस स्पास्कीला रिकडो इथे हरवून, बुद्धिबळातील विश्वविजेतेपद मिळवलं तेव्हा रशियन नसलेला एखादा बुद्धिबळपटू इथवर मजल मारेल ही गोष्ट अशक्य वाटत होती. कारण बुद्धिबळात कल्पनाशक्तीइतकंच शास्त्रशुद्ध अभ्यासाला महत्त्व आहे आणि याबाबतीत रशिया आणि त्यातले ग्रँडमास्टर आघाडीवर होते. शिवाय या स्पधेर्त सुरुवातीलाच तो दोन गुणांनी पीछाडीवर होता. मुळात त्याची खेळायचीच तयार नव्हती, तेव्हा लंडनमधील धनाड्य जीम स्लेटर यांनी स्पधेर्ची रक्कम वाढवून दिली. पहिला डाव हरल्यावर दुसरा डाव खेळायला तो आलाच नाही. चोवीस खेळांची मालिका तिथेच संपणार की काय असं वाटत होतं. पण अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री हेन्री किसिेजर यांनी त्याला खेळण्याची विनंती केली आणि मग तिसरा सामना दर्शक आणि कॅमेरा यांच्या अनुपस्थितीत छोट्याशा खोलीत सुरू झाला. अनेकदा फिशर उशिरा येई आणि स्वत:चा वेळ घालवून बसे. लॉरी इव्हान्स या फिशरच्या बुद्धिबळपटू मित्राने या सामन्याच्या प्रत्येक खेळीचं चित्र आणि विश्लेषण असलेलं पुस्तक लिहिलं आहे.

९ मार्च १९४३ रोजी रॉबर्ट बॉबी फिशरचा जन्म झाला. तो दोन वर्षांचा असताना त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्याचे वडील जर्मन होते. पण प्रत्यक्षात पॉल लेमेनी हा अणुबॉम्बवर काम करणारा शास्त्रज्ञ हे त्याचे वडील होते. फिशर सहा वर्षांचा असताना त्याच्या बहिणीने बुद्धिबळाचा पट आणला आणि फिशर रात्रंदिवस बुद्धिबळ खेळू लागला. वयाच्या बाराव्या वषीर् तो अमेरिकेतील मॅनहॅटन या क्लबमध्ये दाखल झाला. तिथे जॅक कॉलिन्स या शिक्षकाने त्याला शिकवलं आणि आपलं बुद्धिबळावरचं ग्रंथालय उघड केलं. पुढील दोन वर्षांत फिशरने अमेरिकेतील राष्ट्रीय स्पर्धा जिंकण्यापर्यंत मजल मारली. १९५६ साली वयाच्या तेराव्या वषीर् त्याने न्यूयॉर्कमध्ये डोनाल्ड बाय विरुद्ध खेळताना अठराव्या खेळीत आपला वजीर दिला आणि त्यानंतर एकेचाळीस खेळांचा हा डाव जिंकला. या डावाचं वर्णन 'चेस रिव्ह्यू' या मासिकाने 'गेम ऑफ द सेंच्युरी' असं केलं. त्याकाळात फिशर अनेकदा पैशांसाठी प्रदर्शनीय सामने खेळत असे. पारितोषिकाची रक्कम जास्त असली पाहिजे याविषयी त्याचा आग्रह असे. १९५७ साली तो अमेरिकन चॅम्पियन झालाच; पण १९५७-५८च्या अमेरिकन राष्ट्रीय स्पधेर्त त्याने आठ डाव जिंकले आणि पाच अनिणिर्त राखले. वयाच्या पंधराव्या वषीर् एकही सामना न हरता तो चॅम्पियन होता. त्यानंतर १९६६ साली 'जगज्जेते पदा'साठीच्या स्पधेर्ची जी कँडिडेट स्पर्धा होती, त्यात तो पाचवा आला. मिखाईल ताल याने त्याला चार डावांत हरवले. पण पहिले चारही स्पर्धक रशियन होते.

१९६२मध्ये स्टॉकहोममधल्या आंतरराष्ट्रीय स्पधेर्त त्याने बावीसपैकी साडेसतरा गुण मिळवले. रशियन खेळाडू त्याचा खेळ पाहून थक्क झाले. त्यानंतरच्या स्पधेर्त पेट्रो शान जिंकल्यावर बॉबी फिशरने 'रशियन खेळाडूंनी मॅच फिक्स केली आहे' अशा आशयाचा लेख लिहिला, तेव्हाचा जगज्जेता बॉथान विक याला बॉबी फिशर जवळजवळ हरवणार होता. पण सप्टेंबर १९६२मधल्या या ऑलिम्पियाडमध्ये फिशरचा डाव प्रथेप्रमाणे चाळीसाव्या खेळीला स्थगित झाला आणि रात्रभर विचार करून रशियनांनी बोथानविकची सुटका होईल अशी खेळी शोधून काढली. पाल बेनको या फिशरचा रूममेट असलेल्या खेळाडूलाही ती माहिती होती. पण बॉबी फिशरने सामन्याचं विश्लेषण करायला नकार दिला. सामना 'ड्रॉ' झाल्यावर फिशरने म्ह्टलं की बोथानविक सामना चालू असताना सल्ला घेत होता. अर्थातच जगज्जेत्यावर असले आरोप करणं मूर्खपणाचं होतं. पण फिशर हा अत्यंत लहरी आणि शॉर्ट टेंपर होता. या सामन्यानंतर त्याने बुद्धिबळ खेळणं बंद केलं. जगज्जेतेपदाची आस सोडली. पण पुन्हा तो उमेदीनं खेळू लागला. १९६९मध्ये 'माय सिकस्टी मेमोरेबल गेम्स' नावाचं पुस्तकही लिहिलं, जे न वाचता चांगलं बुद्धिबळ खेळणं केवळ अशक्य आहे. 'द लाईफ अँड गेम्स ऑफ बॉबी फिशर' हे फ्रॅन्क ब्रॅडी याने लिहिलेलं पुस्तक 'प्रोफाईल ऑफ अ प्रॉडिजी' म्हणून प्रसिद्ध झालं. ज्यात त्याने फिशरच्या लहानपणात आईने त्याच्यासाठी काय केलं याची माहिती दिली आहे. त्याला बुद्धिबळपटू बनवण्यात त्याचा मोठा वाटा होता. पण त्याच समाजातलं वागणं मात्र सदैव विचित्र राहिलं. समाजाबरोबर त्याला कधीच जमवून घेता आलं नाही. सहकाऱ्यांबरोबर आणि इतर खेळाडूंबरोबर त्याची भांडणं होत. बोथानविकसारख्या जगज्जेत्याबरोबर फिशर आयुष्यात फक्त तीन शब्द बोलला.

स्पास्कीबरोबर झालेल्या जगज्जेतेपदाच्या सामन्यानंतर पुन्हा फिशर त्या स्पधेर्त उतरला नाही. अनातोली कापोर्वशी त्याचा सामना होणार होता. फिशरने त्यासाठी 'फिडे' या संचालक संस्थेला १७९ अटी घातल्या. त्या सर्व 'फिडे'ने मान्य केल्या तरीही अनियमित संख्येचे सामने खेळवावेत आणि दहा डावांत विजयी होणाऱ्याला जगज्जेतेपद द्यावे ही त्याची अट मान्य होऊ शकली नाही. त्यानंतर तो बुद्धिबळ क्षितिजावरून दिसेनासा झाला. 'र्वल्डवाईड चर्च ऑफ गॉड' नावाच्या संस्थेचं तो काम करू लागला. आपले बरेचसे पैसे त्याने त्याला दिले. १९८१ साली तर एका बँक दरोडेखोराशी त्याचं वर्णन जुळतं म्हणून त्याला पकडलं आणि त्याने कुठल्याही प्रश्ानचं उत्तर द्यायला नकार दिल्याने त्याच्यावरचा संशय अधिक गडद झाला. बुद्धिबळाचे जागतिक जगज्जेतेपदाचे सामने आधी ठरवल्याप्रमाणे होतात असे आरोपही त्याने केले. १९८८ साली बुद्धिबळाच्या डिजीटल घड्याळाचं पेटंट त्याने घेतलं. १९९२ साली पुन्हा फिशर आणि स्पास्की यांच्यात सामना झाला. यात जिंकणाऱ्यासाठी ३३ लाख डॉलर्सची रक्कम मिळणार होती. सामना युगोस्लाव्हियात होणार होता. 'युनायटेड नेशनने' या देशावर निर्बंध घातले होते. तिथे खेळल्यास तुरुंगात जावे लागेल, असं अमेरिकन सरकारने धमकावले होते. फिशरने १०-५ असा हा सामना जिंकला आणि त्याच्या अटकेचं वॉरंट निघालं. तो परत कधीही कॅलिफोनिर्याला परतू शकला नाही. १९९८मध्ये जागतिक विजेतेपदकातील त्याचे 'मेमेंटोज' इंटरनेटवर विकायला काढण्यात आले. त्यावर चिडून फिशरने अमेरिकन सरकारविरुद्ध भाषणं केली. २००० साली त्याने एका फिलीपाईन महिलेशी लग्नं केलं. ११ सप्टेंबर रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याची त्याने प्रशंसा केल्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. २००४मध्ये त्याला 'टोकियो' विमानतळावर पासपोर्ट संपल्यानंतर पकडण्यात आले, तेव्हा त्याने आपण वडिलांमुळे जर्मन नागरिक आहोत आणि आईसलँडचे नागरिकत्व घेतले आहे असे सांगितले. फिशरचे खेळणे नेहमी आक्रमक असे. त्याने कधीही प्रतिर्स्पध्याने ऑफर केलेला 'ड्रॉ' स्वीकारला नाही. तो शेवटपर्यंत झुंजत राही. त्याने भाग घेतलेल्या सगळ्या टुर्नामेंटस मोठ्या फरकाने जिंकल्या. त्याच्याबद्दल कॅस्पोरोव्हने म्हटलं आहे की, 'फिशर आणि त्याचे समकालीन यांच्यातील फरक वेगवेगळ्या बुद्धिबळ जगज्जेत्यांमधील फरकांपेक्षा मोठा होता.' अलीकडे प्रसिद्ध झालेल्या अँड्र्यू सॉलिस्टच्या 'बॉबी फिशर रिडिस्कव्हर्ड'मध्ये त्याने म्हटलं आहे 'फिशर मोठ्या प्रमाणावर बळी देणारे डाव (सॅक्रीफिशल गेम) खेळला. यातील बरेच डाव वयाच्या एकविसाव्या वर्षाअगोदर खेळण्यात आले. सांेगट्यांच्या मारामारीतील किमतीचं त्याला खूप आंतरिक भान होतं. डावातील छोटाशा फरकाचंदेखील तो विजयात रूपांतर करीत असे.

जगज्जेता झाल्यावर त्याने पारितोषिकाची १/३ रक्कम 'र्वल्डवाईड चर्च ऑफ गॉड'ला दिली आणि बोरीस स्पास्कीला एक कॅमेरा भेट दिला. त्याच्या माणूसपणाच्या अशा खुणा दुमिर्ळ होत्या; पण बुबिळाच्या दुनियेतला तो एक अद्वितीय माणूस होता. त्याने खेळाला कलेच्या दर्जावर नेऊन ठेवले.

एका लढ्याची सुखद अखेर!

एका लढ्याची सुखद अखेर!
22 Nov 2008, 2244 hrs IST


शशिकांत सावंत

अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा यांच्या विजयाने इतिहासाचे एक नवे पान उलगडले गेले असले तरी इथवरचा प्रवास सहजसोपा नव्हता. गुलामीच्या घृणास्पद प्रथेविरुद्ध अनेक शतके दिलेल्या लढ्यातून हा सोनेरी दिवस दिसला आहे. या प्रदीर्घ प्रवासाची ही आठवण.

...............

बराक ओबामांच्या विजयानंतर जी दृश्ये प्रसिद्ध झाली त्यात त्यांच्या केनियामधील गावातले लोक नाचतानाचे दृश्य आहे. हे सारे आफ्रिकेतून आलेले लोक. यातल्या अनेक आफ्रिकन अमेरिकनांचे पूर्वज गुलामांच्या व्यापारातून इंग्लंड, अमेरिकेत पोहोचले. हा गुलामांचा व्यापार आफ्रिकेचे सर्व प्रांत कुश, घाना, माळी, सोंधाई, बेनिन, इथिओपिया इथून होत असे आणि इजिप्तहून कॅथे, ग्रीस ते बॅबिलॉन, जुडेआ ते रोग अशा बहुतेक प्राचीन राज्यांमध्ये हा व्यापार चाले. यंत्रे नसल्याने मोठ्या प्रमाणावर कामे, पिरॅमिड बांधणीपासून ते शेतमजुरीपर्यंत सर्वत्र हे आफ्रिकन गुलाम वापरले जात. आयाबेरीयन तांब्याच्या खाणीत काम करणारे मजूर किंवा रोममधल्या सल्फरच्या खाणीत काम करणारे मजूर रोमच्या अर्थव्यवस्थेसाठीही आवश्यक होते. युरोपमध्ये घरकामासाठी किंवा शेतीत मजूर म्हणून गुलामांना वापरत. तर पोर्तुगालसारख्या राज्यात लोकसंख्या कमी असल्याने, मजूर लागत.

इसवीसन १४९३ मध्ये पोर्तुगिजांनी पहिल्यांदा आफ्रिकेच्या किनाऱ्यावर पाय रोवले; त्यानंतर डच, फ्रेंच, इंग्लिश, प्रशियन्स सर्वच जण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाऊन संपत्ती आणि गुलामांना आणू लागले. कॅप्टन जॉन हॉकिन्स या 'सी डॉग्ज' या विशेष नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध व्यापाऱ्याने १५६२ मध्ये गयानाच्या किनाऱ्यावरून आफ्रिकन गुलाम आणून ते वेस्ट इंडिजच्या हिस्पीनोआल्डात विकले. हे घडलं राणी एलिझाबेथच्या कारकिदीर्त. तिला या व्यापाराची माहिती कळली तेव्हा ती चिडली. पण यातला नफा तिने पाहिला तेव्हा तिने आपले मत बदलले. ती कॅप्टनच्या पुढील सागरी मोहिमांमध्ये भागधारक बनली. याप्रकारे चाचेगिरी, वाटमारी यातून होणारा व्यापार राजमान्य झाला. गुलामांच्या व्यापारातला नफा वाढत गेला. १६७२ मध्ये हा नफा इतका होता की, केवळ गुलामांच्या व्यापारासाठी प्रिन्स चार्ल्सच्या आशिर्वादाने रॉयल आफ्रिकन कंपनी काढण्यात आली. इंग्लंडचं आरमार जगभर पसरू लागलं तसा गुलामाच्या व्यापारावर इंग्लंडचा कब्जा आला.

परंपरेने आफ्रिकेत गुलाम लिलावाने विकण्यात येत. त्यावर पैस, शस्त्रे, दारूगोळा यांच्या आधाराने युरोपियनांनी आधी कब्जा मिळवला. मग इंग्लंडने. तरीही बरीचशी आफ्रिका सुरक्षित राहिली; कारण रोगराईने आफ्रिकेत गेलेले युरोपियन हैराण होत. 'गोऱ्यांची स्मशानभूमी' असं नावही आफ्रिकेला पडलं होतं. त्या गुलामांची किंमत म्हणून कपडे, चाकू, रम, कट ग्लासेस, दारूगोळा, काचेचे खडे दिले जात. गुलाम विकत घेतल्यावर गरम लोहाने त्यांच्या छातीवर मालकाचा ब्रँड उमटे. ७० फूट लांबीच्या होडीत त्यांना बसवलं जाई. ज्यात बांधल्यावर ते दिवसरात्र वल्हे वल्हवीत. क्रूमेन नावाच्या काळ्या जमिनीतील लोक त्यांच्यावर देखरेख करत.

समुदावरची वाहतूक आणि नंतरची गुलामी याने अनेकजण आत्महत्या करत. रॉयल आफ्रिकन कंपनीच्या जॉ बाबोर्ट या अधिकाऱ्याने १६७८ ते १६८२ या काळात लिहिलं आहे की, 'गयानातून अमेरिकेला आम्ही जे गुलाम पाठवत असू त्यांना वाटायचं आपल्याला शेळ्यामेंढ्यांप्रमाणे नेण्यात येतंय; कारण युरोपीय आपल्याला मारून खाणार आहेत. या भयाने अनेक जण अन्नपाणी सोडून देत आणि मरून जात.'

उत्तर, ब्राझील, वेस्ट इंडिज ही गुलामांच्या बाजाराची केंदं होती. छोट्या होडीतून आणून गुलामांना विकण्यासाठी साखळीने बांधून मोठ्या जहाजात बसवत. सकाळच्या खाण्यानंतर त्यांना वाद्यं वाजवून त्याच्या तालावर उड्या मारायला लावत. ते ही साखळ्यांसकट. दिवसरात्र बांधून एकाजागी बसण्यातून ही सुटका होती. पण अनेकांना या प्रवासात वेड लागले. किंवा कित्येक रोगराईला बळी पडत; अन्न किंवा पाण्याचा तुटवडा पडला तर या गुलामांना मध्येच समुदात फेकून दिलं जायचं. या प्रवासातून अनेक जण अमेरिका किंवा ब्राझीलमध्ये पोहोचत.

या पद्धतीने इसवीसन १५२६ साली 'ल्युकास आयलॉन' या व्यापाऱ्याने पहिल्यांदा अमेरिकेत गुलाम आणले, असा अंदाज आहे. जेम्स टाऊन व्हजिर्निया इथे त्यांची वसाहत वसवण्यात आली. पण तापाच्या साथीनंतर आयलॉन आजारी पडला. गुलामांनी बंड केलं. आणि ते पळाले. पण नंतर बराच काळ गुलामांची निर्यात इतरत्र (उदा. वेस्ट इंडीज सारख्याठिकाणी. त्याचे कारण मोठ्या प्रमाणावर होणारी लागवड) वाढली तशी अमेरिकेत वाढली नाही. निदान इंग्लंडहून जे अमेरिकेत वसाहत करण्यासाठी येत त्यांना मजूर म्हणून तडीपार केलेले छोटे-मोठे गुन्हेगार किंवा युद्धकैदी (विशेषत: आयरिश आणि स्कॉटिश) उपलब्ध होते. ते गोरे होते. इंग्रजी बोलत आणि चक्क गुलामांपेक्षा स्वस्त पडत.

सतराव्या शतकाच्या शेवटी साऊथर्न कॅरोलिना आणि व्हजिर्निया इथे मोठ्या प्रमाणात शेतीची सुरुवात झाली. भात, तंबाखू यांच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर मजूर लागणार होते. त्यामुळे वेस्ट इंडिजहून दरवषीर् एक हजार गुलाम येऊ लागले. या सुमारास कायदा गुलामांना गोऱ्या लोकांप्रमाणेच वागवावे, असं सांगत होता. पण हळुहळू त्यात बदल होऊन गुलामांना आणि त्यांच्या मुलाबाळांना काय पण अखेरपर्यंतच पिढ्यांना गुलाम म्हणून वापरावे असा बदल कायद्यात झाला. १६६३ मध्ये कॅरोलिन, १६६४ मध्ये मेरीलँड आणि न्यूयॉर्क, १६८२ मध्ये पेनसिल्व्हानिया इथे काळ्यांची गुलामी कायद्याने संमत झाली. दक्षिण अमेरिकेत हे गुलाम कायम मजुरी करत. तर उत्तरेकडच्या वसाहतींमध्ये ते मजुरीबरोबरच सुतारकाम, लोहारकाम, कारकुनी, खलाशी अशी कामं करू लागले.

बिशप बर्कले या धमोर्पदेशकाने बायबलमधील नोहाच्या शापाचा अर्थ लावून सांगितले की, ''अँड टी सेड, कर्सड बी कानन; अ र्सव्हंट ऑफ सर्वंट शाल ही बी टू हीज ब्रदर्स'' यातील कनान किंवा हाम या जमातीचे वंशज काळे गुलाम असून (ज्यांना पूवीर् सर्रास निग्रो म्हणून ओळखत) ते वेगळ्याच प्रजाती (स्पेसीज)मध्ये मोडत असल्याने त्यांना माणूस म्हणून मोजणे आवश्यक नाही.

यानंतर अमेरिकेत गुलामगिरी वाढतच गेली. १७१४ मध्ये ५९,००० पासून ते १७५४ मध्ये २,९८,००० पर्यंत गुलामांची संख्या वाढली. अर्थातच, काहीवेळा गुलाम पळून जात किंवा बंड करत. गोरे हे निर्घृणपणे ठेचून काढत. पण नंतरच्या थॉमस जॅकसन, जॉर्ज वॉशिंग्टन, बेंजामिन फ्रँकलिन अशा राजकीय विचारवंतांनी गुलामगिरीविरुद्ध बोलायला सुरुवात केली. १७७१ ते ७६ मध्ये अनेक वसाहतींनी गुलामांच्या आयातीच्या विरुद्ध कायदे केले. १७५० मध्ये रॉयल आफ्रिकन कंपनीनेही व्यापार बंद केला. पण इंग्रजी अर्थव्यवस्था गुलामांच्या व्यापारावर आधारलेली होती. त्यामुळे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जहाज उद्योजक, व्यापारी, उत्पादक यांनी गुलामांच्या व्यापाराला पाठिंबा जाहीर केला. तर २० ऑक्टोबर १७७४ ला झालेल्या सर्व अमेरिकन राज्यांनी (जॉजिर्या वगळता) करारावर सही केली; ज्यात म्हटलं होतं 'आम्ही गुलामांची आयात किंवा खरेदी करणार नाही. एक डिसेंबरनंतर हा व्यापार थांबेल.' तरीही नंतर गुलाम राहिलेच. मूळच्या इंडियन अमेरिकनांना दळणवळणाच्या कामीही त्यांना वापरण्यात आले. १७८१ नंतर जी काँग्रेस अस्तित्वात आली तिने १७७७ साली एक सभा घेतली; ज्यात गुलामीचा निषेध करण्यात आला. पळून गेलेल्या गुलामांना परत करावं आणि गुलामांपैकी तीन पंचमांशांना प्रतिनिधी नेमताना मोजावे' असं सांगितलं. तरीही असलेल्या गुलामांचं काय हा प्रश्ान् होताच.

१८०० साली आणि १८२२ साली दोन उठाव गुलामांनी केले. नॅट नावाच्या गुलामाने १८३१ साली मालकास मारून पलायन केले, अशा घटना घडतच राहिल्या. अमेरिकन यादवी युद्ध हे गुलामांच्या सुटकेचा नवा किरण दाखवत होतं. तेव्हाचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी युद्धात ७५ हजार स्वयंसेवक हवेत असं म्हटलं तेव्हा १५ एप्रिल १८६१ साली मोठ्या प्रमाणावर या आफ्रिकन अमेरिकनांना निग्रो हा श्बद तेव्हाही वापरला जात होता) भाग घेतला. गुलामी रद्द व्हायला सुरुवात झाली. १८६२ मध्ये कोलंबियात गुलामीवर बंदी घालण्यात आली.

१८६५ मध्ये अब्राहम लिंकन यांचा खून झाल्यावरही त्यांनी सुरू केलेली स्वातंत्र्य चळवळ चालू राहिली. काळ्या आफ्रिकन अमेरिकनांना समानतेचे हक्क देणारा सिव्हिल राइट अॅक्ट १८६६ मध्ये पास झाला. (थटीर्न अमेंडमेंट) भेदभाव केल्यास गुलाम व्यक्तीला कोर्टात जाता येणार होतं. यामुळे १८६७ मध्ये दक्षिणेत काळ्यांच्या हाती सत्ता आली. त्यानंतर लेखन, पत्रकारिता, उद्योग, विज्ञान, समाजकारण, संगीत (विशेषत: जॅझ), सिनेमा, खेळ अशा सर्व क्षेत्रात आफ्रिकन अमेरिकन दिसू लागले. 'सिडने पोईश सारखा नट, हॅमील्टन सारखा जॅझ संगीतकार, आजचे जेम्स बाल्डविन, टोनी मॉरिसन किंवा अॅलीस वॉकर सारखे लेखक, ऑपेरा विन्फ्रे सारखे सेलिब्रिटिज, नाओमी कॅम्पबेलसारख्या मॉडेल्स, बस्कीयाथसारखे चित्रकार बिल कॉस्बीसारखे स्टँड अप कॉमेडीयन, महंमद अली, कार्ल ल्युईस पासून विल्यम्स भगिनी पर्यंत अनेक खेळाडू, लुईस आर्मस्ट्राँग, ड्युक एलिंग्टन, मिलेस दाविससारखे जॅझ गायक आणि मुख्य म्हणजे माटिर्न ल्युथर किंगसारखे नेते; या साऱ्यांनी काळे-गोरे भेदभाव नष्ट करायला मदत केली. पण खऱ्या अर्थाने हा भेद नष्ट झाला तो र्वल्ड ट्रेड सेंटरचे दोन जुळे मनोरे ११ सप्टेंबर, २००१ रोजी उद्ध्वस्त झाल्यानंतर!

आज ओबामा निवडून येण्यामगे ही सर्व पूर्वपीठिका आणि पार्श्वभूमी आहे. एका प्रदीर्घ लढ्याची अखेर झाली आहे.

बोमन इराणीचा अभिनय वर्ग

बोमन इराणीचा अभिनय वर्ग
11 Dec 2010, 0123 hrs IST

SMS NEWS to 58888 for latest updates

गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रसिध्द अभिनेता बोमन इराणीने अभिनयाची कार्यशाळा घेतली होती. ही कार्यशाळा म्हणजे 'बोमन इराणीकी पाठशाला' होती. त्या पाठशालेतले धडे...

..................

शशिकांत सावंत

गोव्याच्या 'इफ्फी' म्हणजे ४१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटांबरोबर काही वेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं होतं. यातील एक होता तो बोमन इराणीचा अभिनयाचा मास्टर क्लास! यावेळी स्वत: बोमनने आपल्याला 'मास्टर क्लास' हा शब्द मान्य नसल्याचं सांगितलं. त्याचं अभिनयाविषयीचं बोलणं आणि प्रश्नोत्तराची गुंफण असा हा कार्यक्रम चांगलाच रंगला. सुरुवातीला हिंदी चित्रपटांतील विनोदी नटांची क्लिपिंग्ज दाखवण्यात आली. मग बोमन इराणीने माईक आपल्या ताब्यात घेतला. तो म्हणाला- 'आधी मी स्वत:बद्दल बोलतो. मला लहानपणी सगळे डफ्फर म्हणत. कारण मला डिस्लीक्सिया होता. 'थ्री इडियट'मध्ये व्हायरसच्या बोलण्यात व्यंग आहेे. तो 'स्स'चा उच्चार नीट करू शकत नाही असं दाखवलं आहे. मलाही लहानपणी तो उच्चार करता यायचा नाही. मी बोलताना अडखळायचो. त्यामुळे वर्गात कधी तांेड उघडायचो नाही. मग आईने मला ट्रेनरकडे नेलं. जेव्हा मी नीट बोलू लागलो तेव्हा मला आत्मविश्वास आला. मी व्हायरसच्या भूमिकेत ते अडखळणं वापरलं. मला वाटतं अभिनय म्हणजे नटाने व्यक्तिरेखेत स्वत:चं काहीतरी टाकणं.

मी जन्मलो तेव्हा वडिलांचं निधन झालं होतं. आई, तीन बहिणी, मावश्या अशा बायकाच भोवती असायच्या. मी पहिल्यांदा पुरुषाचा आवाज ऐकला तेव्हा हादरलो. ताजमध्ये वेटरचं काम केलं. फोटोग्राफी केली. घरच्या दुकानात बसून पोटॅटो चिप्स विकले. टॉम क्रूजच्या थाटात हातावर वेफर्सचा पुडा झेलत गिऱ्हाईकाला द्यायचो. (हे सर्व अभिनय करत चाललं होतं.) मी अभिनय करायला हवा, असं शामक दावर मला म्हणाला. तो मला अलेक पदमसीकडे घेऊन गेला. पदमसीनं मला गाणं म्हणायला सांगितलं. नंतर म्हणाला (नक्कल करत),' मी गेली ४० वषेर् नाट्यक्षेत्रात आहे. एका नजरेत माणूस ओळखतो. या माणसामध्ये अजिबात टॅलंेट नाही.' त्याने त्याच्या 'रोशनी' या संगीत नाटिकेत मला वेश्यावस्तीतल्या दलालाची भूमिका दिली. मला केवळ एक गाणं म्हणायचं होतं. मी ते म्हटलं. टाळ्यांचा वर्षाव झाला. शिट्या वाजल्या. मी हे आयुष्यात पहिल्यांदा अनुभवत होतो. मला स्टेजवरून हलावंसं वाटत नव्हतं. त्या नाटकाचा कोरियोग्राफर असलेल्या अर्शद वारसीने मला ओढत विंगेत नेलं. तेव्हा मला अभिनयाची गंमत कळली. लोक टाळ्या वाजवतात. डोक्यावर घेतात. तुमच्याबद्दल लिहून येतं. '

मी दहा वषेर् रंगभूमीवर 'आय अॅम नॉट बाजीराव' हे नाटक केलं. अनेकदा अभिनय करताना तो तुमच्यात भिनत जातो. तुम्ही त्या पात्रासारखं बोलता. मी सुधीर जोशीला म्हटलं की, मी आता बाहेरही नाटकातल्यासारखाच बोलतो. काय करू कळत नाही. सुधीर म्हणाला, 'सिंपल. अप्लाय कोल्ड क्रिम. म्हणाला, कोल्ड क्रिम लावून मेकअपशिवायचा तुझा चेहरा बघ. स्वत:ला सांग की तू हा आहेस.' 'हनिमून ट्रॅव्हल्स'मधील एक क्लिपिंग्ज दाखवलं. बोमन मुलीशी भांडताना खिशात हात घालून सिगारेटचं पाकिट काढतो असं एक दृश्य आहे. ते दाखवल्यावर इराणीनं म्हटलं- 'अनेकदा मी दृश्यात अशा 'प्रॉप' अॅड करतो. कारण आपण घरात वा रोजच्या व्यवहारात कधीच मोकळ्यासारखं बोलत नाही. काहीतरी करतच बोलतो. मी बऱ्याचदा दृश्यात स्वत:ला हव्या असलेल्या गोष्टी घालतो. उदा. 'माय वाईफ मर्डर'मधे मी हॉटेलात जेवायला जातो. जेवताना माझ्या हातातून रुमाल खाली पडतो. तेव्हा मी वेटरला बोलावतो. अबुल जरा रुमाल दे म्हणतो. यातून २-३ गोष्टी साधल्या जातात. एक तर मी हॉटेलात नेहमी येतो हे स्पष्ट होते. मला बायकोच्या हाताचं जेवण आवडत नाही, असा प्रसंग त्यानंतर सिनेमात येतो. त्यामुळे अभिनयाला आधार मिळतो.'

मी जेव्हा 'खोसला का घोसला' चित्रपटात सरदारजीची भूमिका करण्याचे ठरवले तेव्हा दिल्लीचे अभिनेते म्हणाले, 'ये बाबाजी सरदार क्या करेगा?' अशा आव्हानांनी मला नेहमीच चेव येतो. मी बरीच तयारी केली. मुन्नाभाईसाठी सरदार करणार असल्याचं कळल्यावर एक सरदार म्हणाला, 'सरदार शुड नॉट ओन्ली बी जोकी, बट ऑल्सो इमोशनल.' त्यावरून मला क्लू मिळाला. मी ज्या भागात वाढलो तिथे पंजाबी सरदार फार पाहिले नव्हते. मी ग्रांट रोडवरच्या स्पेअर पार्ट विकणाऱ्या सरदारजींना भेटायला गेलो. त्यांना मी बॉल बेअरिंग वगैरे वस्तू विकायला लागलो. आता ही विक्री खूप झाली. आपण ड्रींक घ्यायला जाऊ. मग मी रात्री दहा वाजता घरून निघायचो. बायकोला म्हणायचो, 'ड्युटीवर चाललोय.' ती म्हणायची, 'रात्री दहा वाजता कामाला जाता, परत आल्यावर दारूचं पिंप असल्यासारखा वास अंगाला येत असतो. हे कसलंं काम?'

' तुम्हाला अभिनेता ही ओळख आवडेल की विनोदी अभिनेता?' यावर बोमन म्हणतो,'सगळ्यांना विनोदाचं अंग असतं. पण म्हणून कोणी कॉमेडीयन होत नाही. मी लोकांचा अभिनेता आहे. समाजात जे पाहतो, तेच अभिनयात येतं. अभिनयाचं शिक्षण देणाऱ्या शाळा खूप आहेत. पण थिएटरसारखी शाळा नाही. तिथे शेकडो गोष्टी शिकता येतात. अभिनय करायचा असेल तर संवाद पाठ करा. आपला मार्क (रंगमंचावरची खूण) लक्षात ठेवा, असं सांगण्यात येतं ते खरं आहे. या दोन गोष्टी केल्या की तुम्ही रिलॅक्स होता. आजही मी नसिरुद्दीन शहाच्या फोनची वाट पाहत असतो. मला त्याची दाद महत्त्वाची वाटते.' ...हे सारं सांगताना बोमनने प्रेक्षकांना आपल्या बोलण्याशी एकरुप करून घेतल होतं.

सेल्फ हेल्प पुस्तकांचं जग

सेल्फ हेल्प पुस्तकांचं जग
,
प्रिंट करा सेव करा

ई-मेल करा


प्रतिक्रिया नोंदवा
- शशिकांत सावंत

डेल कानेर्जी ते पाउलो कोएलो पर्यंत अनेकानेक लेखकांनी सेल्फहेल्प कॅटॅगिरीतली पुस्तकं लिहून जगभरच्या वाचकांवर मोहिनी घातली आहे. सतत बेस्ट सेलरच्या यादीत स्थान पटकावणा-या या पुस्तकांचं अंतरंग आणि त्यांच्या यशाचं इंगित जाणून घेण्याचा हा प्रयत्न...
...............

अलिकडे प्रसिद्ध झालेल्या पाउलो कोएलो यांच्या 'अल्केमिस्ट' या कादंबरीने खपाचा उच्चांक गाठला. आजवर अशी अनेक पुस्तकं भरपूर खपतच असतात; पण हे पुस्तक म्हणजे 'सेल्फ हेल्प' प्रकारातली कादंबरी आहे. 'सेल्फ हेल्प' हा इंग्रजीतल्या पुस्तकांचा जॉन्र आहे. संभाषणकलेपासून आत्मिक विकासापर्यंत आणि आनंदी कसं राहावं इथपासून व्यवस्थापनापर्यंत विविध विषयांवर 'सेल्फ हेल्प' प्रकारातली पुस्तकं येतात. यातली पुस्तकं केवळ माहिती सांगणारीच असतात, असं नव्हे. स्वयंपाक कसा करावा, वाहन दुरुस्ती कशी करावी, एकट्या मुलीने कसं जगावं याबद्दलची प्रॅक्टिकल माहिती अनेकदा ही पुस्तकं देतात. या प्रकारातल्या पुस्तकांचीही नावं पाहा : 'हाऊ टू विन फ्रेण्ड्स अॅण्ड इन्फ्ल्युएन्स पीपल', 'थिंक कॅन ग्रो रिच', 'हाऊ टू निगोशिएट'. याच प्रकारातल्या एका पुस्तकाचं नाव चक्क 'हाऊ टू गेट प्रेग्नंट' असं आहे! डेल कानेर्जी, नेपोलियन हिल, विन्सेण्ट नॉर्मन पीले हे तसे जुन्या पिढीतले 'सेल्फ हेल्प' लेखक; पण अलिकडे 'माँक हू सोल्ड हिज फेरारी'चे लेखक रॉबिन शर्मा, 'सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली सक्सेसफुल पीपल'- स्टीव्हन कोवी, पाउलो कोएलो हे सध्याच्या पिढीतले 'सेल्फ हेल्प' लेखक आहे. 'सेल्फ हेल्प' पुस्तकांची मोहिनी कोट्यवधी लोकांवर आहे. यातल्या अनेक पुस्तकांचा खप ५० लाख ते एक कोटी इतका आहे.

पाउलो कोएलो आणि रिचर्ड बाख या लेखकांनी 'सेल्फ हेल्प' प्रकारातल्या पुस्तकांचं कादंबरीकरण (फिक्श्नलायझेशन) केलं. रिचर्ड बाख यांचं 'जोनाथन लिविंग्स्टन सीगल' हे पुस्तक जेव्हा प्रसिद्ध झालं तेव्हा तिचा प्रकार लघुकादंबरीसारखा होता. पण 'नॉन-फिक्शन' म्हणून असाहित्यिक पुस्तकांमध्ये ते टाकलं गेलं होतं. किमान प्रकाशकांनी तरी तसा उल्लेख केला होता.

पाउलो कोएलोचं 'अल्केमिस्ट' हे पुस्तक १९८७ मध्ये प्रसिद्ध झालं. हा ब्राझिलियन लेखक तेव्हा ४० वर्षांचा होता. आज त्याच्या सर्व पुस्तकांचा मिळून खप सहा कोटी इतका आहे. त्यात 'अल्केमिस्ट' आघाडीवर आहे. २००३ मध्ये 'अल्केमिस्ट' हे जगात खपलेल्या सर्वाधिक पुस्तकांमध्ये सहाव्या क्रमांकावर होतं. या पुस्तकाचा गाभा सांगायचा झाला, तर एका वाक्यात सांगता येईल, 'स्वत: पाहिलेल्या स्वप्नाचा शोध घेणं'. यातल्या सान्तियागो या मुलाला एक स्वप्न पडतं. इजिप्तच्या पिरॅमिडपाशी एक मुलगा त्याला दिसतो आणि सांगतो की, 'इथे आलास तर तुला खजिना मिळेल.' त्यानंतर मुलगा या शोधाला निघतो. एक म्हातारा गृहस्थ त्याला मार्गदर्शन करतो. त्याचं नाव असतं माल्की जेदेक. तो मुलाला म्हणतो, 'मी सालेमचा राजा आहे.' त्यावर मुलगा विचारतो, 'एक राजा गुराख्याच्या मुलाशी का बोलतो?' तेव्हा तो सांगतो, 'त्याला अनेक कारणं आहेत. महत्त्वाचं म्हणजे तू तुझ्या भविष्यातलं स्थान शोधण्यास यशस्वी झाला आहेस.' त्यानंतर मुलगा मेंढरांना विकून प्रवासाला निघतो. या प्रवासात त्याला कित्येक माणसं भेटतात. ती त्याला काहीतरी देऊन जातात. कधी एखादा उपदेश, तर कधी जगण्यातलं सौंदर्य दाखवतात. कधी त्यांच्याबरोबर तो एखादा अनुभव घेतो. उदा. तो वाटेत एका दुकानात काम करतो. त्या दुकानदाराला म्हणतो, 'मला इजिप्तला जायचं आहे.' तेव्हा दुकानदार म्हणतो, 'मी मक्केला जायचं स्वप्न पाहतो, पण जात नाही; कारण त्या स्वप्नावरच मी जिवंत आहे.' मुलगा तिथे पैसे कमावून इजिप्तला जायला निघतो आणि तो व्यापारीही मक्केला जायला निघतो.

प्रवासात तुला सतत सूचक चिन्हं दिसतील, असं मुलाला सांगण्यात आलेलं असतं. वाटेत त्याला एक इंग्रज माणूस भेटतो, ज्याने 'अल्केमिस्ट'ची कहाणी ऐकलेली आहे. 'अल्केमिस्ट' म्हणजे जो स्वत:च्या आत्म्यापर्यंत पोहचू शकतो, असा माणूस. हे ज्ञान मुलाला प्रवासात होतं. मुलगा आणि इंग्रज पुढे जात राहतात. पुढे ते युद्ध अनुभवतात. खरोखरचा 'अल्केमिस्ट' त्याला भेटतोही. फातिमा नावाची तरुणी त्याला भेटते, तिच्या तो प्रेमात पडतो. पण पिरॅमिडच्या दिशेने त्याचा प्रवास चालूच राहतो. नंतर प्रचंड वादळ येतं. मुलाला वाळवंट आणि वारा अशा गोष्टींशी संवाद केल्याचा आगळा अनुभव येतो. तो पिरॅमिडपाशी पोहोचतो. खजिन्याच्या आशेने खणू लागतो, पण खजिना सापडत नाही. त्याला सैनिक पकडतात. आपण खजिन्यासाठी खणतोय असं सांगितल्यावर एक सैनिक म्हणतो, 'मलाही स्पेनच्या एका पडक्या चर्चपाशी खजिना असल्याचं स्वप्न पडत असे. पण मी त्यावर विश्वास ठेवला नाही.' मुलाला कळतं स्पेनमध्ये आपण होतो तिथेच खजिना असणार. मुलगा स्पेनला परततो. खजिन्यासाठी खणू लागतो. ते खणताना त्याला वारा सांगतो, 'हे रहस्य तुला आधीचं सांगितलं असतं तर तुला पिरॅमिड पाहता आला नसता.'

ही कहाणी एक फेबल (रूपककथा) आहे. अशा कहाण्यांमध्ये जीवनविषयक तत्त्वज्ञान, तात्पर्यं ठासून भरलेली असतात. 'अल्केमिस्ट'मध्ये वाचायला आवडतील अशी अनेक वाक्यं आहेत. 'जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मिळायची असते, तेव्हा ती मिळवण्यासाठी अख्खं विश्व काम करतं,' हे वाक्य घ्या. 'ओम शांती ओम'सारख्या 'आजच्या' चित्रपटात हे वाक्य तीन-चार वेळा येतं. 'अल्केमिस्ट'ला मुलगा विचारतो, 'अनेकजण परिस शोधत होते. पण तो तुलाच कसा सापडला?' त्यावर 'अल्केमिस्ट' सांगतो, 'इतरजण केवळ धनपरिस शोधत होते. त्यांना नशिबात असलेली गोष्ट केवळ शोधायची होती, त्याप्रमाणे जगायचं नव्हतं', 'ज्याच्या हृदयात आनंद असतो, तोच खरा आनंदी असतो', 'खरं सुख प्रवासात, धडपडीत असतं', 'आपण जसे विचार करतो तसे आपण बनतो'- असे अनेक छोटेमोठे धडे पानोपानी 'अल्केमिस्ट'मध्ये सान्तियागोला मिळत जातात. आजवरची बहुतांश सेल्फ हेल्प पुस्तकं हेच सांगतात. त्यांच्या शिकवणीचा गाभा असा सांगता येईल की,

१) तुम्हाला जे काही मिळवायचं असेल त्याचा तुम्ही सतत ध्यास घ्यायला हवा.

२) तुमची इच्छा तीव्र असेल तर तुम्हाला मदत करणारी माणसं मिळतील. गोष्टी आपोआप घडून येतील. यातली काही पुस्तकं असंही सांगतात की, पैसा आणि मटेरियल मिळवण्यातच सुख आहे असं नाही. हे सगळं करताना जगण्याचा अनुभव नीटपणे घेणं यातही आनंद आहेच.

खूप वर्षांपूवीर् प्रसिद्ध झालेल्या नेपोलियन हिलचं 'थिंक अँड ग्रो रिच'सारखं पुस्तक पैशासारखी गोष्ट मिळवायला ध्यास घ्यायला हवा, असं सांगतंच, पण त्याचबरोबर 'फोर्ड'सारख्या मोटार कारखानदारांची उदाहरणं देतं. हेन्री फोर्ड हा स्वत: कामगारांबरोबर वर्कशॉपमध्ये काम करायचा आणि त्याला शेकडो कामगारांची नावं माहीत होती. यासारख्या साध्या गोष्टींचा कामगारांवर परिणाम होतो आणि ते तुम्हाला मदत करतात. डेल कानेर्जीसारखे लेखक सांगतात की, 'दुसऱ्यांच्या गुणांचं अॅप्रिसिएशन, चांगलं वागणं हीदेखील यशाची एक गुरुकिल्ली आहे.' त्यात वस्तूंचं उत्पादन, विक्री, इतरांकडून काम करून घेणं, संवादकौशल्याच्या आधारावर वस्तू विकणं या गोष्टींना महत्त्व प्राप्त झालं. यातूनच व्यवस्थापन, जाहिरात, विक्रीकला यांचं शास्त्र विकसित होत गेलं. दैनंदिन जीवनात काम करून पैसा कमावणाऱ्या पती-पत्नी किंवा एकट्याच नवऱ्याच्या अशा काही आकांक्षा तयार झाल्या त्या पूर्ण करण्यासाठी ब्ल्यू कॉलर जॉब, सेल्समन, विक्री प्रतिनिधी असे रोजगार लाखोंच्या संख्येने तयार झाले. माल विकण्याबरोबरच स्पधेर्ला तोंड देणं, अनेक तास काम करणं त्यातूनही उत्साह टिकवणं या गोष्टी महत्त्वाच्या बनल्या आहेत. आधुनिक पाश्चात्य जगात, विशेषत: अमेरिकेत, याबाबतचं मार्गदर्शन करण्याचा आणि घेण्याचा पुस्तकं हा एक मार्ग होता.

डेल कानेर्जीसारख्यांनी संभाषणकलेबाबतचं पुस्तक लिहितानाच त्याची वर्कशॉप्सही सुरू केली. स्पष्ट उच्चार करणं, बोलण्याचा सराव करणं, आपलं बोलणं पटवण्यासाठी आकडेवारी विशिष्ट पद्धतीने मांडणं यासारख्या कितीतरी प्रॅक्टिकल हिण्ट्स डेल कानेर्जीच्या पुस्तकात आढळतात. उदा. एका कारखान्यात वर्षाकाठी काही हजार चपलांचे जोड तयार होतात. हीच आकडेवारी अशी मांडली की, आमच्याकडे तयार होणारे जोड एकाशेजारी एक ठेवले तर मुंबई ते दिल्ली इतकं अंतर भरेल, तर त्या आकडेवारीचा जोरकसपणा कळतो.

' हाऊ टू स्टॉप वरिंग स्टार्ट लिव्हिंग' नावाचं पुस्तक डेल कानेर्जीने लिहिलं. त्यात त्याने म्हटलं होतं की, तुम्हाला ज्या समस्या भेडसावतात, त्या कागदावर लिहिल्यावर तितक्याशा कठीण वाटत नाहीत, हे त्यांना सांगायचं होतं. डेल कानेर्जीच्या दोन्ही पुस्तकांत छोट्या- छोट्या गोष्टींमधून विकास करून घेतलेल्या व्यक्तींची उदाहरणं मोठ्या प्रमाणावर होती आणि या पुस्तकांची भाषा विलक्षण प्रवाही असे.

१९७०-८० च्या दशकात डॉ. वेन डायर यांची 'पुलिंग युवर ओन स्ट्रिंग्ज', 'युवर एरोनॅस झोन' अशी पुस्तकं प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर 'स्काय इज द लिमिट' हे त्यांचं पुस्तक आलं. आधीच्या दोन पुस्तकांत मानवी त्रुटी व वैगुण्य कशी दूर करावी याची चर्चा होती. उदा. 'पुलिंग युवर ओन स्ट्रिंग्ज'मध्ये आपण काम पुढे ढकलत राहतो, त्यावर एक प्रकरण आहे. त्यावर काय करता येईल याबाबत लेखक म्हणतो, 'जे काम तुम्हाला आवडत नाही ते पाचच मिनिटं करायचं आणि मग बंद करायचं असं ठरवा.' कारण अनेकदा एकदा काम सुरू केलं की, आपण ते सोडत नाही. पण सुरुवात करण्यातच अडचण येते.

' आय अॅम ओके, यू आर ओके' हे पुस्तक वैज्ञानिक पद्धतीने माणसाच्या व्यक्तिविकासाबद्दल सांगतं. एरिक बनेर् या मानसशास्त्रज्ञाने आणि 'आय अॅम ओके यू आर ओके' या पुस्तकाचा लेखक थॉमस हॅरिसने 'बोलणं' चार गटांत विभागलं आहे.

१) आय अॅम ओके, यू आर नॉट ओके.
( मी ठीक आहे; पण तू ठीक नाहीस).

२) आय अॅम नॉट ओके, यू आर ओके
( मी ठीक नाही, पण तू ठीक आहेस).

३) आय अॅम ओके, यू आर ओके

४) आय अॅम नॉट ओके यू आर नॉटू ओके.

या वाक्याचा अर्थ समजून घेण्याअगोदर 'ट्रॅन्सॅक्शन अॅनालिसिस' नावाची जी मानसशास्त्रीय कक्षा आहे तिचा अर्थ समजून घेऊ. मानवी मन हे तीन प्रकारच्या अवस्थांमध्ये असतं. पहिली अवस्था म्हणजे 'मूल', दुसरी अवस्था म्हणजे 'पालक' आणि तिसरी अवस्था म्हणजे 'प्रौढ.' एखादी घटना जेव्हा घडते तेव्हा आपण तिला प्रतिसाद देताना वरीलपैकी तीन अवस्थांमध्ये असतो. उदा. आपण कुठेतरी जात असताना बस मध्येच बंद पडली तर,

१) आपण खूप चिडू, दुर्मुखले होऊ. ही अवस्था मुलासारखी आहे.

२) आपण नीट विचार करून निर्णय घेऊ. म्हणजे असं की, बस पंक्चर झाल्यास दुसऱ्या बसमध्ये चढता येतं. पाच मिनिटं थांबल्यास दुसरी बस येईल. असा विचार आपण घाई नसल्यावर करू आणि घाई असेल तर टॅक्सीने जाऊ.

३) पालक या शीर्षकाखाली येणारा प्रतिसाद हा आईवडील काय सांगतात किंवा संस्कारांनी आपल्याला काय शिकवलं आहे, त्यानुसार येतो. म्हणजे टॅक्सीने जाणं ही चैन अशी जर आईवडिलांची कल्पना असेल, तर आपल्यावरही तो संस्कार येतो आणि मग पुढच्या बसला कितीही उशीर झाला तरीही आपण टॅक्सी करत नाही.

' आय अॅम ओके, यू आर ओके' या वाक्याचा अर्थ असा होतो की, संभषण करताना आपण जेव्हा मूल असतो, तेव्हा समोरच्यानेही तसंच असलं पाहिजे. आपण जेव्हा प्रौढ असतो म्हणजे आपल्यातला प्रौढ जेव्हा प्रतिसाद देतो तेव्हा समोरच्यानेही तसंच बोलणं अपेक्षित असतं. मग ते संभाषण नीट होतं. याचं एक उदाहरण पाहू - तुम्ही आणि मित्र सिनेमाहून आला आहात. मित्र विचारतो, 'सिनेमा कसा झाला?' तुम्ही म्हणता, 'असले सिनेमे मीही बनवेन.' यावर तुमचा मित्र म्हणतो, 'असा सिनेमा बनवल्यास मलाही त्यात रोल द्यायला विसरू नकोस.' आता इथे या संभाषणात तुमच्यातल्या मुलाने बालिश कॉमेंट केली, त्याला मित्रानेही तसाच प्रतिसाद दिला, पण त्याऐवजी जर मित्र म्हणाला, 'सिनेमा बनवणं इतकं सोपं आहे का? तुला सगळ्याच गोष्टी सोप्या वाटतात.' वगैरे वगैरे, तर ते संभाषण बालक व पालकाचं होतं. अर्थातच ते नीट होत नाही. त्यामुळेच दैनंदिन व्यवहारात आपण मूडने प्रतिसाद दिल्यास संभाषण बिकट होतं.

थोडक्यात, बालक-बालक, पालक-पालक, प्रौढ-प्रौढ ही संभाषणं नेहमी निकोपणे होतात. उलट बालक-प्रौढ, बालक-पालक, पालक-प्रौढ ही नेहमीच 'आय अॅम ओके यू आर नॉट ओके' या सदरात मोडतात.

आणखी एका वेगळ्या पुस्तकाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. ते पुस्तक म्हणजे 'झेन अॅण्ड मोटारसायकल मेण्टेनन्स'. हे पुस्तक दर्जाबद्दल बोलतं. यातल्या नायकाने विविध गोष्टी केल्या आहेत; पण त्यात तो असमाधानी आहे. भारतातल्या 'बनारस हिंदू विद्यापीठा'तही तो शिकून आला. माया म्हणजे काय? असं शिक्षकांना विचारल्यावर त्यांनी त्याला मायेबद्दल सांगितलं. मग 'अणुबॉम्बचा स्फोट होऊन माणसं मरणं हीदेखील मायाच आहे का, असा प्रश्न त्याने शिक्षकांना विचारला. ते म्हणाले, 'हो.' यानंतर त्याने विद्यापीठ सोडलं. एक मोटारसायकल घेऊन तो डोंगरदऱ्यातून फिरतो, माणसांना भेटतो. 'क्वालिटी' अर्थात दर्जा म्हणजे काय, याचा तो शोध घेतोय. असं करता करता एक दिवस त्याला ज्ञानप्राप्ती होते. थोडासा बुद्धाच्या शोधासारखाच हा शोध आहे. म्हटलं तर प्रवासवर्णन, म्हटलं तर आत्मचरित्र, म्हटली तर कादंबरी असं वाटणाऱ्या या पुस्तकाने वाचकांना वेड लावलं. 'हिप्पी चळवळीचा' उगम होण्यामागे या पुस्तकाचा मोठा हात होता. जगभर घरदार सोडून निसर्गाच्या सहवासात मिळेल तसं राहायचं अशी प्रेरणा या पुस्तकाने दिली.

याच कालावधीत ह्युज प्राथरचं 'नोट्स टू मायसेल्फ' हे पुस्तक प्रसिद्ध झालं. या पुस्तकात रोजच्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींचं विश्लेषण आहे, ते वाचताना अनेकदा आपल्याला आपल्याच मनाचा ठाव घेता येतो. उदा. लेखक म्हणतो की, काल मला एक विशिष्ट वेदना जाणवत होती. हळूहळू मी तिचं निरीक्षण केलं आणि मला समजलं की, तिचा संबंध माझ्या मनातल्या अस्वस्थतेशी आहे. वेगवेगळ्या प्रसंगात आपण असं का वागतो? आपलं मन विशिष्ट पद्धतीने का विचार करतं? या पद्धतीचं निरीक्षण ह्यू प्राथरने बहुतांशी स्वत:च्या मनाला केंदस्थानी ठेवून केलं आहे. त्यामुळे तो असं करा, तसं करा न सांगता स्वत:च्या मनाबद्दल बोलत राहतो. उलट स्वेट माडेर्नसारख्या लेखकाची 'सेल्फ हेल्प'वरची पुस्तकं वाचकाला सतत वेगवेगळ्या सूचना करत राहतात. ही पुस्तकं बरीचशी उपदेशाकडे झुकतात. 'हाऊ टू स्टडी'सारखी पुस्तकं अभ्यास कसा करावा याचं तंत्र सांगताना स्मरणशक्ती, झोप, अभ्यासाचं तंत्र अशा विविध गोष्टींची माहिती देतात. असं पुस्तक वाचताना कुणाची तरी उपदेशबाजी वाचतोय असं वाटत नाही. विविध ग्राफ, आराखडे, आकडे यातूनही हे पुस्तक विषय मांडतं. 'सेल्फ हेल्प'मधल्या अनेक पुस्तकांचं वर्णन 'प्रॅक्टिकल मॅन्युअल' म्हणूनही केलं जातं. 'व्हॉट कलर इज युअर पॅराशूट' या पुस्तकाच्या शीर्षकाखाली लिहिलं आहे, 'अ प्रॅक्टिकल मॅन्युअल फॉर जॉब हंटर्स'. नोकरी शोधताना काय करावं, हे या पुस्तकात आहे. या पुस्तकामध्ये आपल्याला आवडणारं काम कसं शोधावं, स्मरणशक्ती, आपल्याला कोणाबरोबर काम करायला आवडेल यासारख्या प्रश्नांचे तक्ते जागोजागी आढळतात. १९७० मध्ये हे पुस्तक प्रसिद्ध झालं आणि आजतागायत त्याचा खप कोटीच्या वर गेला असावा.

व्यक्तिगत अनुभवावर आधारित पुस्तकांचा खप कमी असतो. पण ती अधिक परिणामकारक असतात. उदा. 'अप द ऑर्गनायझेशन' हे रॉबर्ट टाऊनसेण्ड याचं पुस्तक. टाऊनसेण्ड हा 'रेण्ट अ कार' या कंपनीचा प्रमुख होता. वेळोवेळी तो आपल्या मित्रांना व्यवसायातल्या अनुभवाचा सल्ला देई. त्याने म्हटलं की, 'मी माझ्या शंभरेक मित्रांसाठी हे पुस्तक लिहिलं आहे. 'एरीज रेण्ट अ कार' ही कंपनी तोट्यात होती. रॉबर्ट टाऊनसेण्डने ती फायद्यात आणून दाखवली आणि नंतर 'अप द ऑर्गनायझेशन' हे पुस्तक लिहिलं आणि ते 'न्यूयॉर्क टाइम्स'च्या बेस्ट सेलरच्या यादीत सात महिने होतं. १९७० मध्ये ते प्रसिद्ध झालेलं असलं, तरीही त्यातला बराचसा भाग आजही उपयोगी आहे. पूर्ण पुस्तक अल्फाबेटिकली रचलेलं आहे. म्हणजे ए-असिस्टण्ट, बी-बॉस, बजेट. सी-चेअरमन या पद्धतीने पुस्तकाची मांडणी केलेली आहे. अनेकदा अख्ख्या पानात केवळ ८-१० ओळीच आढळतात. त्यामुळे कुठलंही पान काढून कधीही वाचता येतं. या प्रकरणात अनुभवावर आधारित छोट्या-मोठ्या गोष्टी त्यांनी दिल्या आहेत. उदा. १३ व्या पानावर 'कॉल युवरसेल्फ' असा १३-१४ ओळींचा मजकूर आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, 'तुम्ही जो व्यवसाय करत असाल त्यातून सुटी घेतल्यावर स्वत:च्याच कंपनीत फोन करा आणि एक ग्राहक म्हणून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो ते बघा. तुम्हाला खूपच खळबळजनक गोष्टी कळतील. जी माणसं वेडीवाकडी उत्तरं देतील त्यांची पदं आणि नावं विचारू नका. शिक्षा करण्यासाठी तुम्ही हा फोन केलेला नाही, तर सुधारणेसाठी केला आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर फोन करून स्वत:चीच अपॉइण्टमेण्ट मागा. मग तुम्हाला काय अनुभव येतो ते बघा.' बजेट, प्रमोशन, शेअर होल्डर्स, कामगर युनियन अशा सर्व विषयांवर त्याने एक-दीड पानात साधेपणाने लिहिलेलं आहे आणि क्षणोक्षणी त्यात प्रॅक्टिकल हिण्ट आहे.

' सेल्फ हेल्प' प्रकारातलं खपाचं उच्चांक गाठणारं आणखी एक पुस्तक म्हणजे 'पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग' हे विन्सेण्ट नॉर्मन पीले यांचं पुस्तक. दैनंदिन जीवनातल्या कंटाळा, नैराश्य, कामातला निरुत्साह, मानसिक अस्वस्थता या सर्वांवर मात करण्यासाठी 'पॉझिटिव्ह थिंकिंग' म्हणजे सतत भावात्मक विचार करणं, हे पीले यांनी या पुस्तकात सांगितलं आहे. त्यासाठी त्यांनी 'बायबल'मधल्या उताऱ्यांचा आधार घेतला आहे. इफ गॉड बी फॉर अस, हू कॅन बी अगेन्स्ट अस' (देव जर आपल्याबरोबर असेल तर आपल्याविरुद्ध कोण जाणार) किंवा 'जर तुमची श्ाद्धा असेल तर तुम्हाला काहीही अशक्य नाही'. स्वत:बरोबर सतत बाळगणाऱ्या सेल्समनचं त्यांनी उदाहरण दिलं आहे. पीले यांचं काम प्रामुख्याने काऊन्सेलरचं होतं. तेव्हा विविध क्षेत्रातली माणसं त्यांना भेटत. त्यामुळे बायबलच्या आधारे श्ाद्धा आणि विश्वास यातून पीले त्यांना धीर देत. त्यांनी प्रस्तावनेत म्हटलं आहे की, 'या पुस्तकात मी जे सांगतो आहे ते मी कठोर परिश्ामातून शिकलो आणि मला नेहमीच त्या समस्यांतून उपाय सापडला. जिझस ख्रिस्ताच्या शिकवणीतून मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत. 'असं असलं तरीही हे पुस्तक धामिर्क नाही.

' माँक हू सोल्ड हीज फेरारी'मध्ये लेखक एका कायदेविषयक कंपनीत राब राब राबत असतो. त्याच्याकडे पाच आकडी पगार, बंगला, फेरारी सर्व सुखं असतात. पण स्वत:साठी वेळ नसतो. आयुष्य सतत तणावाखाली असतं. एक दिवस हे सगळं सोडून तो भारतातल्या एका खेड्यात जाऊन राहतो आणि तिबेटियन साधूंमध्ये राहून शांत, नैसगिर्क जीवन जगताना त्याला आपण ऐहिक गोष्टींच्या मागे धावून काय गमावलं हे कळतं. हे पुस्तक रॉबिन शर्मा यांनी लिहिलं आहे, तर पाउलो कोएलो यांनी 'अल्केमिस्ट'. हे दोन्ही लेखक पाश्चिमात्य विचारसरणी आणि मटेरिअलिझम नाकारतात.

पहिल्या-दुसऱ्या महायुद्धानंतर पाश्चिमात्य जग हळूहळू सुबत्तेकडे गेलं. पूर्व जर्मनीसारखे अपवाद सोडले तर सर्वत्र उत्तम उत्पादन, विक्रीयंत्रणा यामुळे मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आणि सुस्थितीत राहू लागला. हा वर्गच प्रामुख्याने स्वप्न पाहणारा होता आणि त्याला वरच्या वर्गात जायचे रिसोसेर्स म्हणून मध्यमवर्गाने 'सेल्फ हेल्प' पुस्तकांकडे पाहिलं आणि बऱ्याच अंशी त्यांनी या पुस्तकांचा उपयोग करून घेतला. केवळ मानसिक समाधान करणं आणि प्रेरणा देणं एवढंच काम करणारी ही पुस्तकं नव्हती. विविध भाषा शिकवणं, घरातल्या वस्तू रिपेअर करायला शिकवणारं 'वंडर वर्कर'सारखं पुस्तक, गणित, विज्ञान असे विषय शाळा, कॉलेजात न गलेल्यांना शिकवणारी पुस्तकं, 'कम्प्युटर फॉर डमीज', 'चेस फॉर डमीज' असे विविध विषय ते न येणाऱ्यांना शिकवणारी पुस्तकं असा मोठा पसारा 'सेल्फ हेल्प' पुस्तकांमध्ये आहे.

७०-८० नंतर तिसरं जग म्हटल्या जाणाऱ्या साऊथ अमेरिका, भारत इथेही मोठ्या प्रमाणात मध्यमवर्ग निर्माण झाला. भारतामध्ये आणीबाणी आणि जनता राजवटीनंतर मध्यमवर्गाचं सामाजिक, राजकीय महत्त्व लक्षात आलं आणि त्यातूनच या वर्गाकडे राज्यकतेर् लक्ष देऊ लागले. त्याअगोदर या वर्गातली मुलं मेडिकल, इंजिनियरिंगला जाण्याचं ठरवत. राजीव गांधींच्या राजवटीनंतर भारताने खऱ्या अर्थाने कम्प्युटर स्वीकारला आणि सर्व क्षेत्रात आपण प्रोफेशनल बनलं पाहिजे, असा एक विचार सुरू झाला. नोकरी व्यतिरिक्त इतरही उद्योगांची चाचपणी करू लागला. कधी नाही ते माणसं जास्त पगारासाठी कंपन्या बदलू लागली. ९० च्या दशकात आपण नवीन आथिर्क सुधारणा स्वीकारल्या. त्यानंतर अनेक वर्षं बचत करून ठेवलेला पैसा मध्यमवर्गाने बाजारात आणावा यासाठी बहुराष्ट्रीय मोठ्या कंपन्या विचार करू लागल्या. त्यातून अनेक चॅनेल्स सुरू झाल्याने कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचणंही त्यांना सोपं झालं.

पण या सगळ्यातूनच जुन्या पद्धतीचं शांत, सुस्थिर जीवन आणि नवीन जीवनपद्धती ज्यात मॉल, मल्टिप्लेक्स, विविध पद्धतीच्या गाड्या येतात हे मध्यमवर्गाला खुणावू लागलं. तरुण मुलं-मुली ८-१२ हजार रुपयांसाठी शिक्षण सोडून कॉल सेंटरमध्ये राबू लागली. एक प्रकारे या देशाच्या काही भागाचं अंशत: अमेरिकनायझेशन सुरू झालं आणि अमेरिकेत लोकप्रिय असलेल्या 'सेल्फ हेल्प' पुस्तकांचा आणि संस्थांचा ट्रेंड इथेही सुरू झाला. शिव खेरा ते अरिंदम चौधरींपर्यंत इथले स्थानिक गुरूही तयार झाले. 'सेव्हन हॅबीट्स ऑफ हायली सक्सेसफुल पीपल'सारख्या पुस्तकातले उतारे दडपून ही माणसं आपल्या नावावर देऊ लागली. 'चिकनसूप फॉर द सोल'मधल्या भाबड्या कथांतून त्याला जीवनाचा आशय गवसू लागला. हे बीजं इतरही क्षेत्रात पसरत आहेत. संदीप खरेसारखे खास कॉल सेंटर सेन्सिबिलिटीचे कवीही आता साहित्यात निर्माण झाले आहेत.

ज्या जगात आपण जगत असतो ते आपल्या व्यतिरिक्त शेकडो-हजारो माणसांना आपल्याशी जोडत असतं. त्यातून निर्माण झालेली व्यवस्था जगड्व्याळ असते आणि त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांना सोपी उत्तरंही नसतात. म्हणूनच 'सेल्फ हेल्प'मधली बहुतेक पुस्तकं तिथे कुचकामी ठरू शकतात. पण डॉ. वेने डायर किंवा नॉर्मन विन्सेण्ट पिले यासारखी मंडळी तुमची मनोदशा आनंदी आणि भावात्मक करण्यावर भर देतात. हे काम एकप्रकारे रिलिजीअस आहे. (धामिर्क अर्थाने नव्हे) काही अंशी आपल्याकडच्या धामिर्क गुरूंनीही हे काम केलं. त्यामुळे १९९० नंतर त्यांनाही अमाप लोकप्रियता लाभली.

' सेल्फ हेल्प' पुस्तकांमधला बराचसा भाग उपयोगी असला तरी आपल्या समाजात नोकरी व्यवसाय करताना जो अनुभव येतो त्यामागे भारतीय मनोरचनाही आहे. उदा. आपल्याकडे व्यवसाय करताना पेमेंट उशिरा देणं किंवा चुकवणं याचं प्रमाण मोठं आहे. यावर तुम्ही काय कराल? माझा एक उद्योगपती मित्र सांगतो,'नारायण मूतीर्ंना इतकं यश आणि पैसा मिळवणं शक्य झालं, कारण त्यानी सतत परदेशी कंपन्यांशी व्यवहार केला. तिथे पेमेंट सांगितलेल्या वेळेत मिळतं. त्यांनी भारतीय कंपन्यांशी व्यवहार केला असता तर कठीण असतं. इथे मला सात लाख रुपयांचं पेमेंट मिळवण्यासाठी कोर्टात जावं लागलं आणि अनेक वर्षं त्याचा खटला चालू आहे.'

तरीही 'नोट्स टू मायसेल्फ', 'झेन अॅण्ड आर्ट ऑफ मोटरसायकल मेण्टेनन्स', 'बुक ऑफ क्वेश्चन्स'सारखी पुस्तकं हळूहळू आपल्याला फ्रिट्झो काप्राचं 'टनिर्ंग पॉइण्ट' किंवा अॅलन वॅट्सच्या 'झेन बुद्धिझम'च्या पुस्तकांकडे नेतात. बर्ट्राण्ड रसेलसारख्यालाही 'कॉन्कवेस्ट ऑफ हॅप्पीनेस'सारखं पुस्तक लिहावंसं वाटलं. यावरून सेल्फ हेल्प पुस्तकं वाचण्याइतकीच लिहिण्याची उमीर् किती प्रबळ आहे हे लक्षात येतं. काही वेळा मानसशास्त्र, व्यवस्थापन, गणित, बुद्धिबळ, चित्रकला यासारख्या विषयातल्या आनंददायक गोष्टींचा साठाही ते आपल्याला दाखवतात आणि अगदीच काही नाही तर कधी कधी नुसताच निखळ वाचनाचा आनंद आपल्याला देतात.

जी पुस्तकं सिनेमाच्या विशिष्ट आकृतीबंधांना स्पर्श करतात ती यशस्वी ठरतात. उदा. 'सुपरमॅन' मालिका, 'द गॉडफादर'सारखी कादंबरी, 'रामायण', 'महाभारत', 'ओडिसी'सारखी महाकाव्यं यामध्ये काही विशिष्ट आकृतीबंध आढळतात. याचं कारण हजारो वर्षांच्या माणसाच्या मेंदूच्या उत्क्रांतीत आगीचं भय, मोठ्यांबद्दल आदर, अपमानाबद्दल चीड अशा गोष्टी साठवल्या गेल्या आणि साहित्यात त्यांना शब्दरूप मिळालं. गेल्या १०० वर्षांतले माणसांचे ऐहिक शोध हादेखील त्याच्या मेंदूतल्या आकृतीबंधाचा भाग झाला नसेल ना आणि त्यातूनच पाउलो कोएलोसारख्याच्या 'अल्केमिस्ट'मधून या भागाला स्पर्श होत असावा. त्यामुळे कोट्यवधी वाचकांचं ते आवडतं पुस्तक ठरलं.

थोडक्यात पाश्चिमात्य लेखकांच्या लेखनापासून सुरू झालेला 'सेल्फ हेल्प' पुस्तकांचा ट्रेंड आता आशियाई आणि पौर्वात्य पद्धतीच्या लेखनाकडे झुकतो आहे. अलीकडचे गाजलेलं नाव म्हणजे दीपक चोप्रा. त्यांची 'क्वांटम हिलिंग' आणि इतर पुस्तकं 'होलिस्टिक लिव्हिंग'वर भर देतात. योग, आयुवेर्द, शाकाहार, निसर्गाशी ट्युण्ड अशा राहणीतून निरोगी राहणं आणि मन प्रसन्न ठेवणं वगैरे विचार त्यात असले तरी फ्रिज्दॉक काप्रापासून पीलेपर्यंत हॉलिवुडचे अभिनेते आणि सेलिब्रिटिज यांच्या शिष्योत्तमांमध्ये असल्याने त्यांना आणि पुस्तकांना मोठा वाचकवर्ग लाभला. राहणीमानाबरोबरच अध्यात्मिकतेलाही त्यांची पुस्तकं महत्त्व देतात. त्यामुळे ध्यानधारणेचाही आग्रह आढळतो.

त्यामुळेच पुस्तकांच्या कुठल्याही दुकानात आज खपातल्या पुस्तकांचं मोठं दालन 'सेल्फ हेल्प' प्रकारातल्या पुस्तकांनी व्यापलेलं आढळतं आणि एकाच वेळी त्यात सर्व पिढ्यातले लेखक आढळतात. नेपोलियन हिल, डेल कानेर्जी ते स्टिफन कोवी, दीपक चोप्रा, रॉबिन शर्मा हे सारे एकाच वेळी लोकप्रिय असल्याचे दिसतात. त्यातला आपला 'यशाचा ब्रँड' कुठला, हे वाचकांनी चाळून ठरवायचं असतं.

Thursday, January 12, 2012

आपल्यासमोरचे नेमके प्रश्न कोणते? शशिकांत सावंत, सोमवार, ९ जानेवारी २०१२

आपल्यासमोरचे नेमके प्रश्न कोणते?
शशिकांत सावंत, सोमवार, ९ जानेवारी २०१२
आत्ता अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा धुरळा खाली बसल्यावर आणि लोकपाल विधेयकावरच्या चच्रेने अंतिम टोक गाठल्यावर भ्रष्टाचाराव्यतिरिक्त असलेल्या इतर प्रश्नांचा विचार करायला हरकत नाही, पण या साऱ्याच प्रश्नांचा विचार प्रसारमाध्यमांमध्ये, चॅनेल्सवर किंवा वृत्तपत्रांत वेळोवेळी होतोच. हे प्रश्न कोणते? अर्थातच यादीच करायची ठरविली तर पिण्याच्या पाण्याच्या दुर्भिक्षापासून बालमृत्यूच्या दरापर्यंत आणि गर्भजल परीक्षेनंतर स्त्री-भ्रूणहत्येपासून वाढत्या महागाईपर्यंत अनेक प्रश्नांची यादी करता येईल, पण वेळोवेळी समाजात प्रकटणारे आणि प्रसारमाध्यमांत विचार केले न जाणारे काही मूलभूत प्रश्न असे आहेत
कॉमनसेन्सचा अभाव - अलीकडेच दोन रुपयांची नवीन नाणी वापरात आणण्यात आली. या नव्या नाण्यांचा आकार जवळपास एक रुपयाच्या नव्या नाण्याइतकाच आहे. परिणामी छोटय़ा छोटय़ा व्यवहारांत उदा. रिक्षा किंवा भाजी घेताना, मोड घेताना प्रत्येक नाणे चाचपून पाहावे लागते. आता पूर्वी होते तसे चौकोन, षटकोन हे वेगळे आकार नाण्यांसाठी का वापरता येऊ नयेत? बरे, या सगळ्या गोंधळामध्ये एक रुपयाचे समजून दोन रुपयांचे नाणे देणे-घेणे या व्यवहारात दिवसाकाठी काही पसे जातातच. बरे हे झाले सरकारचे म्हणजे धोरणे ठरविणाऱ्यांचे. त्यांना कॉमनसेन्सचा वापर करता येत नाही. असे असले तरी सामान्य माणसांचे काय?
वाशीसारख्या ठिकाणी मी राहतो तिथे साधारणपणे उच्चभ्रू आणि साक्षर वस्ती जास्त आहे. आता अशा ठिकाणी रेल्वेच्या रांगेत एका वेळी ५० ते ६० माणसे उभी असलेली दिसतात. खरे रांग न लावता कुपन घेता येते, शिवाय अलीकडे सीव्हीएम कार्ड निघाली आहेत, ज्यात स्वत:च स्वत:चे तिकीट काढता येते, पण या पन्नासजणांमध्ये किंवा रांगा लावणाऱ्या सर्वामध्ये तंत्रज्ञानाच्या वापराची एवढी भीती का? बरे, एका वेळी कुपन काढायला जास्त पसे लागतात, ही अडचण मानता येईल, कारण सीव्हीएम कार्ड शंभर रुपयांखाली मिळत नाही, पण कुपन ३० रुपयांखालीही मिळते. आणि वाशीहून सीएसटीच्या दिशेने, कुल्र्याच्या पुढे कुठलाही प्रवास करायला १६ रुपये लागतात, म्हणजेच कुपन घेतल्यास तुमचे १४ रुपये जास्तीत जास्त अडकून पडतात. ही गुंतवणूक काही पंचवीस मिनिटे रांगेत उभे राहण्यापेक्षा जास्त नाही.
सामान्य कायदेपालनाचा अभाव- पुन्हा वाशीचेच उदाहरण देता येईल. वाशी हे नियोजित शहर असल्याने येथील फुटपाथ मोठे आहेत. परिणामी फुटपाथवरून एका वेळी चार ते पाचजणांना चालता येते असे बहुधा एकमेव शहर असेल, पण वाशीतील बहुतेक सेक्टर्समध्ये फुटपाथवरच गाडय़ा पार्क केलेल्या आढळतात. पुन्हा या गाडय़ांचा आकार आणि ब्रँड पाहिला तर लक्षात येते की, पंचवीस लाखांची गाडी फुटपाथवर पार्क करणाऱ्याला अडाणी कसे म्हणता येईल? पसा, संस्कार आणि सभ्यता यांचे अगदी गणितीय नाते नसले तरी काही वेळा तरी सुसंस्कृतता आणि श्रीमंती याचा संबंध असावा की नाही? हैदराबादसारख्या शहरात माणसे उलटय़ा मार्गाने वेगात स्कूटर चालवितात, पण आता पुणे, नाशिकसकट सर्वच शहरांत हे लोण आले आहे. थोडक्यात, कायदा हा पोलीस समोर असतानाच पाळायचा असतो, याबद्दल आपल्या देशात लोकांना खात्रीच आहे. काही वर्षांपूर्वी एका इंग्रजी सायंदैनिकाने मर्सडिीज बेन्झ भाडय़ाने घेतली आणि त्याचे वार्ताहर त्यातून अनेक पंचतारांकित हॉटेल्सना भेट देऊन आले. त्यांनी असे नोंदविले की, अशी गाडी घेऊन गेल्यावर कोणीही सुरक्षारक्षक तुम्हाला रोखत नाही. अर्थातच सुरक्षेबद्दलचा आपला दृष्टिकोन असा असल्यावर २६/११सारखे प्रकरण घडले तर नवल काय? साधारणपणे व्हीआयपी मंडळींना कुठेही अडविले की ते नाराज होतात. ज्यांना सेलिब्रिटी म्हटले जाते, त्यांचा चेहरा हाच पासपोर्ट असल्याने ते आणि त्यांच्यासोबतच्या मंडळींना न तपासताच पाठविले जाते. थोडक्यात, कायद्यासमोर सर्व माणसे समान असली तरी काही अधिक जवळ आहेत. हे सारे कोणत्या विधेयकाने बदलता येईल?
सर्जनशीलतेचा अभाव- काही तरी निर्माण करता येणे, नव्या कल्पना सुचणे, निर्मितीची क्षमता असणे याला सर्जनशीलता म्हटले जाते. सध्या विविध वाहिन्यांवरून नृत्य, गाणी अशा सो कॉल्ड कलाविषयक ज्या स्पर्धा घेतल्या जातात त्या थोडा वेळ पाहिले तरी लक्षात येते की, या साऱ्यांना कशा तऱ्हेची तरी हुबेहूब नक्कल करणे म्हणजेच कला वाटते. हुबेहूब मायकल जॅक्सन ते हृतिक रोशन, सलमानसारखे नाचणे किंवा हुबेहूब आशा भोसले, कुमार सानू यांचा आवाज काढणे म्हणजेच कला, असे वाटते.
िहदी सिनेमाचे उदाहरण घेऊ. फार कमी िहदी सिनेमे एखाद्या ओरिजिनल कल्पनेवर आधारित असतात. समजा, चुकूनमाकून कथा वेगळी असली तरी त्यातील अनेक युक्त्या, क्लृप्त्या हॉलीवूड ते कोरियन अशा जगभरातल्या चित्रपटांमधून घेतलेल्या असतात.
शिक्षण- गेल्या काही वर्षांत इंटरनॅशनल स्कूल नावाचा एक विचित्र प्रकार उदयाला आलेला आहे, म्हणजे मुलांनी एअरकंडिशन्ड वर्गात बसायचे आणि विद्या संपादन करायची. आज ३० ते ४० वर्षांची असलेली जी मंडळी आपल्या मुलांना अशा शाळेत घालीत आहेत, त्यांनी आपण कसे शिकलो ते आठवून पाहावे. मोठय़ा भावांची पुस्तके आणि प्रसंगी कपडे वापरून शाळेत जाणारी अनेक मंडळी मुलांना मात्र अशा शाळेतच चांगले शिक्षण मिळेल असे का मानतात? आइन्स्टाइन, रामानुजम वगैरे जन्मालाच यावे लागतात. विशिष्ट शिक्षणपद्धती वाव देऊ शकते, पण अशा शिक्षणपद्धती अर्थातच परंपरांवर अवलंबून असतात. उदा. ऑक्सफर्ड, केंब्रिज विद्यापीठ, बनारस िहदू विद्यापीठ, फग्र्युसन, रुईया, रुपारेल अशा ठिकाणी काही परंपरा आढळेल. ही परंपरा अर्थातच खर्च होणारा पसा किंवा श्रीमंती याच्याशी संबंधित नाही. शाळा, कॉलेजच्या प्रयोगशाळांमध्ये अद्ययावत सामग्री, वाचनालयात अद्ययावत पुस्तके असली पाहिजेत यात शंकाच नाही, पण एअरकंडिशन्ड वर्ग आणि आठवडय़ाला नवीन गणवेश हा सोस कुठला आणि याचा शिक्षणाशी संबंध काय?
लहान मुलांना देण्यात येणारे कलाविषयक शिक्षण त्यांच्या मुक्त कल्पनाशक्तीला वाव देणारे हवे. चित्रकलेसारख्या शिक्षणात तर हे अधिकच हवे, पण अलीकडे बहुतेक शाळांमधून मुलांना आऊटलाइन काढून दिलेल्या आकारात रंग भरायला सांगितले जाते. अनेकदा हा रंगही कोणता असावा याची आकृती असते. आश्चर्य म्हणजे शिक्षणतज्ज्ञ आणि चित्रकार यांनी जाहीरपणे भूमिका घेतलेली नाही.
कामाची नावड- साधारणपणे पूर्वी ३१ डिसेंबरची गर्दी कमी असायची. आता ३१ डिसेंबरला बहुतेक मौजमजेची ठिकाणे बुक झालेली असतात. गोव्यासारख्या ठिकाणी विमानाचे भाडे ७२ हजार रुपये व्हावे इतकी गर्दी लोटली आहे. आठवडाभर काम करून वीकेण्डला मौजमजेच्या ठिकाणी जायचे ही खास पाश्चात्त्य त्यातही अमेरिकन परंपरा. मात्र ही मंडळी आठवडाभर राबराब राबत असतात. उलट आपल्याकडे एकूणच कामाची नावड आहे. सरकारी कचेऱ्यांत दुपारी मोकळेपणे भरपूर वेळ जेवण आणि चहाची सुट्टी घेणे, आरामात काम करणे, ते आíथक धोरणांमुळेही फार बदललेले नाही. काही क्षेत्रे अशी असतात की, जेथे घडय़ाळानुसार काम करायला पर्यायच नसतो. हॉस्पिटल्स किंवा अतिमहत्त्वाच्या सेवा यांचा समावेश यात करता येईल किंवा थोडीशी सो कॉल्ड क्रिएटिव्ह क्षेत्रे म्हणजे जाहिरात, चित्रपटनिर्मिती क्षेत्र. यातही दीर्घकाळ काम केल्याशिवाय पर्याय नसतो, पण चांगल्या नोकरीचे वर्णन आपल्याकडे ‘नोकरी चांगली आहे, फार काम नसते’ अशा शब्दांत केले जायचे. आजही परिस्थिती बदललेली नाही. ज्यात झोकून द्यावे असे काम आपल्याला मिळणे आणि तशा प्रकारची पॅशन असणे एकंदरीने अपवादात्मक आहे.
साधेपणा हा गुन्हा- गेल्या काही वर्षांत दोन प्रकारच्या साधेपणाला अडाणीपणा मानले जाऊ लागले आहे. कपडे किंवा राहणीमानात साधेपणा असणे आणि गाडी ते लॅपटॉप अशा गोष्टी. कपडे नीटनेटके असावेत समजू शकते, पण दूरदर्शन सीरिअल्स पाहून अगदी घरातही इस्त्री केलेले कपडे घालून माणसे जेवणाच्या टेबलावर बसू लागली आहेत आणि जाहिराती आणि मीडियामुळे निरनिराळी गॅझेट्स वापरू लागली आहेत. असे अनेक तरुण दिसतात. त्यांच्याकडे टेबलावर घरी आणि ऑफिसात कॉम्प्युटर, लॅपटॉप, आयपॅड असते. पुन्हा मोबाइलमध्ये ई-मेल वगैरे पाहण्याची सोय असते. काही वेळा दोन मोबाइल असतात. साधे आणि सरळ जगता येते ही गोष्ट आपण हरवून बसलो आहोत. पुन्हा धुतलेले आणि परीटघडीचे कपडे वापरणे, यांसारख्या गोष्टी दिसायला ठीक असतीलही, पण एकशे दहा कोटींतील ५५ कोटी माणसे समजा रोज कपडे धुऊन आणि इस्त्री करून वापरू लागली तर..
वर उल्लेखिलेल्या कुणी तरी कायदे मोडत असेल तर त्याला अटकाव करण्यासाठी प्रत्यक्ष कृती करणे किंवा तक्रार करणे ही गोष्ट पुरेशी आहे, पण अशा गोष्टीसाठी किती माणसे पुढे येतात, आणि एकूणच व्यवहारात आणि समाजात आपण बदलणे, कृतिशील आणि सजग असणे हाच उपाय आहे. दुसऱ्या व्यक्तीने येऊन कृती करणे हे भारतीय मनाला मोहक वाटते, पण स्वत: पुढाकार घेणे आणि कृती करणे हाच समस्यांवरील उपाय आहे.